
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाट बनतोय कचर्याचा अड्डा.
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर सातत्याने घडणार्या अपघातांमुळे घाट चर्चेत आलेला असतानाच नव्या समस्येची भर पडली आहे. कचरा विल्हेवाटीसाठी घाटातील मोकळ्या जागेचा आधार घेतला जात आहे. कचर्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.भोस्ते घाटातील अवघड वळणावर अपघातांची मालिका सुरुच आहे. विशेषतः अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणार्या अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे घाटातील प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी कचरा विल्हेवाटीसाठीघाटातील मोकळ्या जागेचा वापर सुरू होता. टीकेची झोड उठल्यानंतर या ठिकाणी कचरा टाकण्याची प्रक्रिया बंद पडली होती.सद्यस्थितीत पुन्हा भोस्ते घाटातील मोकळ्या जागेत कचरा टाकला जात आहे. हा कचरा नेमका कोण टाकतो, याचा उलगडा झालेला नाही. पावसामुळे कचरा कुजत असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे वाहनचालकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com