
पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचा दौरा
रत्नागिरी, दि. १८ : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी ६.२० वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी ११ वाजता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था / व्यक्तींना पुरस्कार प्रदान सोहळा (स्थळ : स्व. शामराव पेजे सभागृह, जि.प. आवार )
दुपारी १२.३० वाजता मालगुंड येथील नियोजित प्राणी संग्रहालयाबाबत आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय )
दुपारी १.१५ वाजता रत्नागिरी जिल्हा डॅशबोर्ड बाबत बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय )
दुपारी ३ वाजता राखीव (स्थळ: म. ओ.वि.म. विश्रामगृह ) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
रविवार दि. २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता केंद्र व राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान रत्नागिरी नगरपरिषद नागरी बेघरांना निवारा या घटकांपर्यत नागरी बेघरांना नवीन निवारा इमारत बांधकाम करणे या विकासकामाचा उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : आठवडा बाजार रत्नागिरी) दुपारी २.३० वाजता रत्नागिरी येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.000