
दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू.
दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील शेतकरी दीपक लक्ष्मण पवार (वय ३४ ) हे दिनांक १० जुलै रोजी शेतात कामासाठी गेले असता त्यांना सर्पदंश झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र दापोली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले ; मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले.तेथे उपचार सुरू असतानाच ११जुलै रोजी सकाळी पावणे नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला.