
डॉ. अतुल वैद्य यांची कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालाच्याप्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती
.
लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांची कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या प्रभारी कुलगुरूपदी निुयक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा आदेश राजभवन कडून जारी करण्यात आला. डॉ. वैद्य हे नीरी चे संचालक म्हणून निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला.
डॉ. वैद्य यांनी केमिकल इंजिनिअरींग मध्ये पदव्युत्तर पदवी आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून पीएच् डी. प्राप्त केली आहे. त्यांना 34 वर्षांचा संशोधन अनुभव असून, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन अशा विषयांमध्ये त्यांनी संशोधन केले आहे. अध्यापन, संशोधन आणि प्रशासन या तीनही आघाडयांवर त्यांचे कर्तृत्व प्रख्यात आहे. नीरी चे संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ विशेष दखलपात्र ठरला आहे.
अत्यंत साधे, निगर्वी, कामसू, प्रशासन कौशल्य असलेले आणि शैक्षणिक संस्थांच्या जडणघडणीचा विकासाचा ध्यास घेवून त्यासाठी दूरदृष्टी ठेवून योजना कार्यान्वित करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण क्षेत्रासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. पर्यावरण क्षेत्राशी संबंधित 200 हून अधिक प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. 80 हून अधिक संशोधन लेख विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे. 12 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी प्राप्त केली आहे.
विश्वविद्यालयाचे कुलसचिव सर्व अधिष्ठाता व संवैधानिक अधिकारी व कर्मयोगी यांनी मा. कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांचे अभिनंदन व नियुक्तीचे स्वागत केले आहे.



