
एसटी प्रशासनाने सायंकाळची फणसवळे बस बंद केल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत.
रत्नागिरी शहराच्या आजुबाजूचे ग्रामस्थ व शाळेत जाणारे विद्यार्थी एसटी च्या बससेवेवर अवलंबून असतात. मात्र रत्नागिरी शहरानजिकच्या मजगांवमार्गे फणसवळे बस सायंकाळी ६ वा. सुटणारी एसटी बस एसटी प्रशासनाने अचानक बंद केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. ही एसटी सेवा पुन्हा सुरू न केल्यास १ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा फणसवळे ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत सरपंच निलेश लोंढे, संतोष आंबेकर, मुकेश माने, रामचंद्र आंबेकर, गौरव नाखरेकर आदी शिष्टमंडळाने अधिकार्यांना निवेदन दिले आहे. या भागातील अनेक मुले शिक्षणासाठी रत्नागिरी शहरात जातात. मात्र त्यांना येण्यासाठी पूर्वी असणारी ६ वाजतानाची बस बंद झाल्याने त्यांना आता बससाठी वाट पहावी लागल्याने त्यांना घरी येण्यास उशीर होत आहे. याबाबत एसटी महामंडळाला वारंवार नोटीसा देवूनही त्यांनी याबाबत दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.www.konkantoday.com