
पाग पॉवर हाऊस येथे दुचाकीला कारची जोरदार धडक, एकजण गंभीर जखमी.
शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे संदेश भालेकर यांच्या दुचाकीचा बुधवारी सायंकाळी पाग पॉवर हाऊस येथे अपघात झाला. एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळून बेशुध्द पडले. त्यांना तातडीने कामथे उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र अधिक उपचाराची गरज असल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्यांना कोल्हापूर येथे हलविले आहे.संदेश भालेकर हे आपल्या दुचाकीने सायंकाळी चिंचनाक्याहून पाग पॉवर हाऊसच्या दिशेने निघाले होते. पोलीस स्थानकासमोरील चढाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आले असता रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणार्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. कारची ठोकर बसताच संदेश भालेकर हे रस्त्यावर कोसळले.www.konkantoday.com