
गुहागर तालुक्यातील हर्णे समुद्रात बंदी कालावधीत मुंबईतील मासेमारी नौकांची मच्छिमारी, स्थानिकांच्यात संताप.
दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रात मुंबईकडील मासेमारी बोटी मासेमारी करताना आढळून आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवाय या मासेमारी बोटींना अभय कुणाचे? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. अरबी समुद्रात इतर जिल्हयातून आलेल्या जवळपास १०० बोटी मासेमारीसाठी खोल समुद्रात आल्याचे पहायला मिळत आहे. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत माशांचा प्रजननाचा कालावधी व समुद्राला येणारे उधाण यामुळे मासेमारी बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. ते पूर्वापार सुरू आहेत. परंतु गेले दोन दिवसांपासून हर्णे समुद्रात मुंबईकडील मासेमारी नौका मासेमारी करताना आढळून आल्या आहेत. एकंदरीत हर्णै: दापोली तालुक्यातील हर्णै समुद्रात मासेमारी करणार्या नौका. स्थानिक मच्छीमारांनी शासनाच्या नियमानुसार मासेमारी बंद ठेवून बोटी शाकारून ठेवल्या आहेत. परंतु परजिल्हयातील मच्छीमार मात्र राजरोसपणे समुद्रात मासेमारी करत आहेत. त्यामुळे या मच्छीमारी करणार्यांना कोण पाठीशी घालत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.www.konkantoday.com