
गणपती उत्सवासाठी२७ तारखेपर्यंतच्या नियमित ५९७ बस दोन महिन्यांआधीच फुल्ल
राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने मुंबई, ठाणे व पालघरमधील चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.२७ तारखेपर्यंतच्या नियमित ५९७ बस दोन महिन्यांआधीच फुल्ल झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई सेंट्रल आणि परळ डेपोमधून रोज १२ बस कोकण मार्गावर धावतात. तसेच ठाणे आणि पालघरमधूनदेखील नियमित बस असतात.
या बसचे बुकिंग २३ जून ते २७ जून या कालावधीमध्ये फुल्ल झाल्याने अतिरिक्त ५००० बसची तरतूद करण्यात आली आहे. त्यांचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात २२ जुलैपासून जादा बसेसमधील गट आरक्षणाला सुरुवात होणार असून, त्यात इतर व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सवलतीही मिळणार आहेत.