कशेडी घाटात दरड कोसळून काही तास होण्याआधीच घाटाला पर्याय असलेल्या बोगद्याजवळही दोनदा दरड काेसळली


मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील कशेडी घाटात दरड कोसळून काही तास होण्याआधीच घाटाला पर्याय असलेल्या बोगद्याजवळही दोनदा दरड काेसळली आहे. चालू वर्षीच्या पावसात दुसऱ्यांदा असा प्रकार घडला असल्याने या मार्गावर आता दुहेरी संकट ओढवले आहे.मंगळवारी पहाटेच्या सुमारास बोगद्याच्या अगदी जवळ गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळली होती. ती दरड हटवण्यात आल्यानंतर दुपारी पुन्हा मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा रस्त्यावर कोसळला.

सुदैवाने, ही मार्गिका आधीच बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या मार्गावरील वाहतूक यामुळे ठप्प झाली
दरम्यान, केवळ कशेडी बोगद्यावरच नव्हे तर जुन्या कशेडी घाटातही दरड कोसळल्याने रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या दोन्ही मार्गांवर दरडीचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथील घाटरस्त्यावर दरड कोसळल्याने कशेडी बोगद्याला पर्यायी असणारा मार्गही बंद झाला आहे. परिणामी, या दोन्ही मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button