
एकत्र आल्यास ठाकरे बंधूंची चांदी… नाहीतर भाजपने दणका दिलाच म्हणून समजायचं ! ठाकरेंचा सर्व्हे काय सांगतो?
:* आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर एकसंध शिवसेनेचे वर्चस्व आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे भाजपने मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याची तयारी सुरु केली आहे.दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असलेले 40 पेक्षा अधिक माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गळाला लावले आहेत. त्यामुळे येत्या काळात मुंबई महापालिका ताब्यात मिळवण्यासाठी भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वरळी येथील ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडल्यानंतर मुंबईत सर्व्हे केला असून यामध्ये येत्या काळात एकत्र आल्यास ठाकरे बंधूंची चांदी होणार असल्याचे पुढे आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूची राजकीय युती होणार की नाही अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने चाचणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेल्या सर्व्हेमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिकेत १०० पेक्षा जास्त जागा जिंकतील, असे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.या सर्व्हेमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला 25 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज आहे. महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्व्हे करण्यात आला आहे. या अंतर्गत सर्व्हेमध्ये 2017 च्या महापालिका निवडणुकीत जागा 2012 च्या महापालिका निवडणुकीत एकसंध शिवसेनेला 75 तर भाजप 71 जागा मिळाल्या होत्या तर 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते. त्यावेळी शिवसेनेला 84 तर भाजपला 82 तर मनसेने सात जागा जिंकल्या होत्या.