
युनियन बँक ऑफ इंडीयाला 5 कोटी 12 लाख 98 हजार रुपयांना फसवणाऱ्या कर्जदार, शाखा व्यवस्थापक, मधहस्थांसह 23 जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शाखा व्यवस्थापकाला हाताशी धरत खोटी कागदपत्रे सादर करून युनियन बँक ऑफ इंडीयाला 5 कोटी 12 लाख 98 हजार रुपयांना फसवणाऱ्या कर्जदार, शाखा व्यवस्थापक, मधहस्थांसह 23 जणांवर रत्नागिरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरेश चंद्रशेखर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन शाखाध्यक्ष एस.प्रशांत सध्या (रा . क्षेत्रीय कार्यालय कलबुर्गी राज्य कर्नाटक मुळ रा . एस.कोर्टूम्मा निळुवंजी गाव बेनी हल्ली , पोस्ट हर्पन्नहल्ली ता . जि . दावनवेरे , राज्य कर्नाटक) राजेश शंकर सनगरे ( भाटी मि – या ता . जि . रत्नागिरी ) समीर कमलाकर शिवलकर (रा . झाडगाव ता . जि . रत्नागिरी ) सखाराम ताना वेदरे (रा.घर नं . ४५७ करबुडे ) विजय गंगाराम कदम (रा.घर.नं. १४८ गाडेवाडी मुर्शी ता.संगमेश्वर ) शैलेंद्र सदानंद शिंदे , (रा . दासुरकरवाडी पो . नाखरे ता . जि . रत्नागिरी ) महादेव पांडुरंग तांबे , (रा . तांबेवाडी दांडेआडोम , ता . जि . रत्नागिरी ) संतोष गोविंद रेवाळे , (रा.कोंडवाडी , फणसवळे , ता.जि.रत्नागिरी), प्रदिप वसंत बरगोडे (रा .पो . कोतवडे ता . जि . रत्नागिरी) बाबल्या राजु सावंत , (रा . बौद्धवाडी जांभरुण ता.जि. रत्नागिरी ) रमेश शंकर पंगेरकर (रा . जाकादेवी परीसर शिवार आंबेरे ता . जि . रत्नागिरी ) शशिकांत भिकाजी भडेकर (रा . मधलीवाडी भडे ता . लांजा ) मनिष विश्वास दांडेकर (रा . ब्राम्हणवाडी , दांडेओडोम ता . जि . रत्नागिरी) शंकर सोनु सोनवडकर (रा . करबुडे ता . जि . रत्नागिरी) रंजना भिकाजी सोनवडकर (रा . करबुडे ता . जि . रत्नागिरी ) हरी देमातांबे (रा . करबुडे ता . जि . रत्नागिरी ) कल्पना तेंडुलकर (रा . मधलीवाडी , भडे ता . लांजा ) देवजी कांबळे (रा . बौद्धवाडी , आगरनरळ पो . खालगाव ता . जि . रत्नागिरी ) गजानन शंकर लिंगायत (रा किल्ला ता.जि.रत्नागिरी २० ) विश्वास वासुदेव मांडवकर (रा . वरचीवाडी दांडेआडोम ता . जि . रत्नागिरी ) प्रिती विजय कदम रा . शळी कदमवाडी ता . जि . रत्नागिरी ) दिवाकर रघुनाथ पाटील (रा . हनुमानवाडी , तोनदे ता . जि . रत्नागिरी) गालिब आदम शेख (रा . आशीर्वाद अपार्टमेंट , थत्ते संकुल , उद्यमनगर ता . जि . रत्नागिरी) या सर्वांवर भा. दं. वि. क. 406, 409, 420, 465, 468, 471, 472,119, 200, 193, 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील फिर्यादी चंद्रशेखर यांना युनियन बँकेकडुन झाल्या आदेशा प्रमाणे सन २०१५-२०१६ या सालात २० कर्जदार यांनी अर्ज घेण्यासाठी सादर केलेली संबधित कागदपत्रे ( ७/१२ उतारा व अन्य कागदपत्रे तसेच खोटे व बनावट भाडे करारपत्र / वट मुखत्यारपत्र ) कर्ज मागणी अर्ज व त्या संबंधित कागदपत्रे तसेच कर्ज मंजूर केलेल्या संदर्भातील सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती असलेल्या एकुण २० कर्जदार यांनी तसेच सदर कर्ज मंजुरी करीता मध्यस्ती म्हणुन राजेश शंकर सनगरे , रा भाटीमिया , ता . जि . रत्नागिरी व समीर कमलाकर शिवलकर , रा . मांडवी झाडगाव , ता . जि . रत्नागिरी यांनी आपसात संगनमत करुन युनियन बँक ऑफ इंडीया या बॅकेची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बँकेकडुन आंबा पिकपाणीसाठी कर्ज मंजुरी करीता संशयास्पद कगदपत्रे तयार करुन ती खरी आहेत असे भासवून त्याद्वारे कर्ज मंजूर करुन घेवुन त्या मंजुर रक्कमेचा आंबा पिकपाणीकरीता वापर न करता , वैयक्तीक खर्चासाठी वापर करुन सदर रक्कमेची परत फेड केलेली नाही . तसेच कर्जदार हे घेतलेले कर्ज फेड करु शकतात अगर कसे याबाबत कोणतीही शहानिशा न करता तसेच त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करता शाखा व्यवस्थापक एस . प्रशांत यांनी बँकेकडुन कर्ज मंजुर करुन देवुन आपल्या अधिकाराचा गैरवापर केला . म्हणुन बँकेची ५ काेटी १२ , ९ ८,००० / – रु . ऐवढ्या रक्केची फसवणुक केली. या संदर्भात शाखा व्यवस्थापक एस . प्रशांत यांची बॅकेकडुन चौकशी झाली त्यामध्ये ते दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बँकेने तक्रार केली आणि आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com