
लांजातील कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे मंगळवारी विशेष करिअर मार्गदर्शन आणि कौन्सलिंग सत्राचे आयोजन.
रत्नागिरी, दि. १६. – जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी! जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मंगळवार, २२ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत लांजा येथे विशेष करिअर मार्गदर्शन आणि कौन्सलिंग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लांजा ताज सिटी सेंटर, दुसरा मजला, डावरा वसाहत, बाजार पेठ, लांजा या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच, करिअर निवडीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन व समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त इच्छुक युवक-युवतींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनीकेले आहे. या संधीचा फायदा घेऊन आपले भविष्य घडवण्यासाठी योग्य दिशा मिळवा!