
मुंबई, कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह उपनगरात, पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावर मंगळवारी पावसाने हजेरी लावली. काल धो धो पडणाऱ्या पावसाचा फटका नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला बसला. मात्र आज मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह रत्नागिरी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्गाला पावसाचा यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शाळा आणी कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.
हवामान खात्याने नाशिक, धुळे, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या काही भागात मुसळधार पावसाची नोंद केली आहे. शहरात आणखी पाऊस पडण्याची शक्यता असून बुधवारी ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह रत्नागिरी आज ऑरेंज अलर्ट तर पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्गाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.