
मद्यपान करुन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा अवमान ; संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
मुख्य न्यायदंडाधिकारी-रत्नागिरी यांच्या चेंबर मध्ये मेडिटेशन सुरु असताना मद्यपान करुन हातवारे व आरडाओरडा करणाऱ्या संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दशरथ हिंदूराव सुर्वे (वय ४२, रा. जावकर प्लाझा, सी वींग, जयस्तंभ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १४) दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या चेंबरमध्ये घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्य न्यायदंडाधिकारी पिंगळे यांच्या चेंबरमध्ये मॅरेज पिटीशन, मेडिटेशन सुरु असताना संशयित दशरथ सुर्वे हे मद्यार्काच्या अमलाखाली सार्वजनिक ठिकाणी हातवारे करुन मोठमोठ्याने आरडा ओरडा केली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अभिजित पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.