
रत्नागिरी शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हरचिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेतील नवीन बंधारा आता पूर्णत्वाच्या दिशेने.
रत्नागिरीतील मिरजोळे, झाडगाव, उद्यमनगर एमआयडीसीतील उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हरचिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेतील नवीन बंधारा आता पूर्णत्वाच्या दिशेने असून, त्याचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे.पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ 2024 मध्ये सुरू होऊन विक्रमी वेळेत पूर्णत्वाकडे जात आहे, विहिरीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील वर्षीपासून उद्योजकांची दीर्घकाळची समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होणार आहे.हरचिरी येथे एमआयडीसीने 1972 मध्ये एक जुना बंधारा बांधला होता. त्याची साठवण क्षमता 0.297 दशलक्ष घनमीटर होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी शहर आणि एमआयडीसी परिसरात वाढलेली लोकसंख्या, तसेच उद्योगांच्या वाढत्या पाणी वापरामुळे या जुन्या बंधार्यातून मिळणारे पाणी अपुरे पडू लागले होते.
विशेषतः उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर बनत होती, ज्यामुळे स्थानिक रहिवासी आणि उद्योजक दोघेही त्रस्त होते. या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका नव्या आणि मोठ्या बंधार्याची नितांत गरज होती.या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी पुढाकार घेतला. त्यांनी एमआयडीसीच्या माध्यमातून नवीन बंधार्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून घेतला आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळवून दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे हा प्रकल्प वेगाने मार्गी लागला आहे,