
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड व संगमेश्वर भागात मुसळधार पाऊस, बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात
रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर व मंडणगड भागात बाजारपेठेत व रस्त्यावर पाणी आले आहे संगमेश्वरात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रामपेठ आठवडा बाजारात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा धोका लक्षात घेऊन दुकानदारांनी आपला माल सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.
अनेक दुकानदारांनी तातडीने दुकानांमधील वस्तू आणि महत्त्वाचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे.
या पूरस्थितीचा परिणाम केवळ बाजारपेठेवरच नाही, तर स्थानिक रहदारीवरही झाला आहे. रामपे,कोंडआसुर्डे, मराठी शाळा आणि अंगणवाडीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडणगड भागात देखील कालपासून मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे अनेक ठिकाणी घराभोवती व रस्त्यावर पाणी साठले आहे