
मत्सगंधा एक्सप्रेसमधून प्रवास करताना महिलेचा ३० हजारांचा ऐवज चोरीस.
रेल्वे प्रवास करत असताना अज्ञाताने ३० हजाराचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद मोनिका डिसुजा (६३, कर्नाटक) यांनी दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसुजा या त्यांच्या पतीसोबत कर्नाटक राज्यातील मरणे येथे गेल्या होत्या. तेथून त्या मुंबई येथे येण्याकरिता उडपी रेल्वे स्टेशनहून मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रवास करत होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग चोरून नेली. त्यामध्ये २० हजार किंमतीचा व १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३० हजारांचा ऐवज होता. रेल्वेतील चोरीच्या घटना वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.www.konkantoday.com