
करवाढीविरोधात रत्नागिरी हॉटेल व्यावसायिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.
राज्य शासनाने काही महिन्यांपासून शासनाने विविध करांमध्ये मोठी वाढ केली आहे. ज्यामुळे हॉटेल व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. अन्यायकारक करवाढ तत्काळ मागे घ्यावी, जर ही करवाढ रद्द झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा हॉटेल व्यावसायिक असोसिएशनने दिला आहे.या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनने सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. असोसिएशनचे सचिव सुनीलदत्त देसाई, उदय लोध, ठाकुरदेसाई आदी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करवाढीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असल्याची कैफियत मांडण्यात आली. मद्यविक्रीवरील करांमध्ये केलेल्या अन्यायकारक करण्यात आली आहे, ही करवाढ तत्काळ मागे घ्यावी, असे म्हणणे आहे.जुलै २०२५ मध्ये मद्यविक्रीवरील अबकारी करात तब्बल ६० टक्केनी वाढ करण्यात आली आहे. असोसिएशनने या अवाजवी करवाढीमुळे हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचे अधोरेखित केले आहे.www.konkantoday.com