
सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन संपन्न*
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या प्रशालेत शुक्रवार दिनांक 11 जुलै 2025 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्र. मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होत्या तर प्रमुख वक्ते प्रशालेचे सहाय्यक शिक्षक धनाजी वाघमोडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते धनाजी वाघमोडे यांनी देशाच्या विकासापुढे लोकसंख्या वाढ ही प्रमुख समस्या असल्याचे सांगितले. तर देशात असणारी बेरोजगारी, अंधश्रद्धा , गुन्हेगारी, पर्यावरणाचा ऱ्हास , साक्षरतेचा अभाव हेच देशाच्या लोकसंख्या वाढीस पूरक घटक आढळतात याचाच बिमोड करून लोकांच्या मध्ये या घटकाविषयी जनजागृती करणे हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. जनजागृती हाच कायद्यापेक्षा मोठा उपाय असल्याचे आवर्जून सांगितले.
वसुंधरेला वाचवणे हेच आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे नमूद केले. जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमाचे अध्यक्षा संजना तारी यांनी लोकसंख्या वाढ देशाच्या प्रगतीस कशी मारक आहे हे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत पटवून दिले. कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशालेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिल सागवेकर यांनी मानले.