
हर्णे येथील ’गोवा भुईकोट’ किल्ल्याचे बांधकाम पावसामुळेच कोसळले.
दापोली तालुक्यातील हर्णे येथील ’गोवा भुईकोट’ किल्ल्याचे नव्याने झालेले बांधकाम नुकत्याच झालेल्या पावसात कोसळले होते. हे बांधकाम पावसामुळेच कोसळले असल्पाचा स्पष्ट निवार्ळा पुरातत्व विभागाच्या अभियंत्यांच्या पथकाने तरुण भारत संवादशी बोलताना दिला. नुकतीच या विभागाच्या वरिष्ठ पथकाने दापोलीतील हर्णे येथे येऊन गोवा किल्ल्याच्या कोसळलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.तालुक्यातील हर्णे येथे असणार्या ’सुवर्णदुर्ग’ या जलदुर्गाच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेल्या गोवा किल्याची कमालीची दुरवस्था झाली होती. याबाबत ’तरुण भारत संवाद ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यानंतर सरकारने याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन या किल्ल्याच्या सवर्धनाचे काम पुरातत्व विभागामार्फत हाती घेतले. शिवाय या उन्हाळ्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली मात्र अनेक दशके हे काम टिकण्याची अपेक्षा असताना जून महिन्यात झालेल्या पावसात केवळ २ महिन्यात या किल्ल्याचे नव्याने केलेले बांधकाम कोसळले. यामुळे या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या. ठेकेदारावर कारवाईची मागणीही करण्यात येऊ लागली. यानंतर पुरातत्व विभागाच्या रत्नागिरी, मुंबई आणि नागपूर येथील पथकाने या किल्ल्याच्या पडलेल्या बांधकामाची नुकतीच पाहणी केली. या पथकामध्ये पुरातत्व विभागाचे रत्नागिरी येथील अभियंता विशाल भरसट, मुंबई येथील वास्तू विशारद शरयू मोरे व पुरातत्व विभागाचे निवृत्त कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे यांचा समावेश होता. या पथकाने गोवा किल्ल्याची सखोल पाहणी केली. चुन्याचे मिश्रण कडक होण्यासाठी लागतो जास्त कालावधी यावेळी माहिती देताना पुरातत्व विभागाचे निवृत कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे म्हणाले, सामान्यपणे जेथे पराचे बांधकाम होते, तेथे २ दगडांना सांधण्यासाठी सिमेंटचा वापर करण्यात येतो. मात्र किल्ल्याच्या बांधकामामध्ये सिमेंटचा वापर करण्यात येत नाही. या किल्ल्याच्या बांधकामामध्ये चुना, रेती, गूळ, बेलफळ, उडीद, जवस तसेच या मागातील साहित्याच्या उपलब्धतेनुसार मिश्रण बनवण्यात येऊन त्याचा वापर करण्यात आला. सिमेंट सामान्यपणे २१ दिवसांमध्ये पाण्याचा योग्य मारा झाल्यास कडक होते. मात्र किल्ल्याच्या बांधकामासाठी बनवण्यात येणारे चुन्याचे मिश्रण कडक होण्यासाठी बराच कालावधी लागतो, तालुक्यातील हर्णेतील गोवा किल्ल्याच्या बांधकामामध्येही चुन्याचे मिश्रण वापरण्यात आले आहे. मात्र यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाला. त्यामुळे या मिश्रणाला केले एकसंघ होण्यासाठी कमी कालावधी मिळाला. म्हणूनच हे बांधकाम कोसळले असावे.www.konkantoday.com