
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं मंदिर गर्दीच्या दिवशी 22 तासांऐवजी 19 तासच खुले राहणार.
साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं मंदिर गर्दीच्या दिवशी 22 तासांऐवजी 19 तासच खुले राहणार असल्याची माहिती आहे.आतापर्यंत मंदिर 22 तास खुले होतं. मात्र यामध्ये बदल करीत आता 19 तास मंदिर खुलं राहणार आहे.
तुळजा भवानी प्रशासनाच्या या निर्णयाने गर्दीच्या दिवशी भाविकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या निर्णयानुसार, रविवार, मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेदिवशी मंदिर पहाटे एक ऐवजी आता चार वाजता उघडणार आहे. याशिवाय इतर दिवशी सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवारी या दिवशी मंदिर सहा वाजता उघडेल. मंदिर संस्थांनने जाहीर प्रगटनाद्वारे याबाबत माहिती दिली. त्यामुळे या विशेष दिवशी मंदिर तब्बल तीन तास उशीरा खुलं होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची पुजारी, भाविक वर्गातून मागणी केली जात आहे.