
तुम्हाला सळो की पळो करतो..! ‘आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही’; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा!
:* मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक घेतली. ज्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक जरांगे यांनी दिली आहे. 29 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईत धडकणार आहे.27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी सोडून 29 ऑगस्टला मुंबई गाठायची. आता मागे हटायचे नाही. विजय मिळवायचा, त्याशिवाय मुंबईतून वापस फिरायचे नाही. आता ही लढाई आरपारची आणि अंतिम असेल, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या राज्यव्यापी बैठकीत दिला होता. आता रणभूमीत उतरायचं, लढायचं आणि विजयाचा गुलालही मराठ्यांनीच उधळायचा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्यात आहे, 58 लाख नोंदी सापडल्या असून 4 कोटी मराठा समाज आरक्षणात गेला आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
फक्त 7 ते 8 टक्के समाज राहिला आहे, त्यासाठी आता ही आरपारची लढाई असल्याचे जरांगे म्हणाले. दरम्यान, आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.मनोज जरांगे यांनी काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांची भेट घेतली आहे. या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की सर्व पक्षातील आमदार खासदार आणि मंत्री महोदयांना आम्ही स्वतःहून फोन केले होते.आमचं गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न तुमच्यापाशी मांडायचा आहे. त्यांच्याकडे आमचं गाऱ्हान सांगणं आमचं काम आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही जाऊन सांगा की मराठी आणि कुणबी एकच आहेत तो जीआर काढा असेही जरांगे यांनी म्हटले आहे.मागच्या पंधरा दिवसात नोंदी सापडलेले आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिल्या जात नसल्याचे जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. हे सगळे जर ऐकत नसतील तर पहिल्यापेक्षा 29 ऑगस्टला पाच पट जास्त लोक मुंबईला जातील असा दावाही मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केला.
आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फोन करून सांगितलेले आहे की तुमच्याकडे गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा तुमच्याकडे मांडायचा आहे. एकदा जर मी 29 ऑगस्टला आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.ज्याला आपण निवडून पुढे पाठवले. तोच आपल्या आरक्षणाबद्दल बोलत नाही. आता म्हणून आम्हीच आता मरु पण विजयच घेऊन येऊ, तसा मोकळ्या हाताने माघारी येणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर यांना सळो की पळो करतो.. असे सांगून ते पुढे म्हणाले की ज्या दिवशी आंतरवालीत राज्यव्यापी बैठक झाली, त्या दिवशी जागा सुद्धा पुरली नाही. आता मुंबईत लोक कसे येतील हे फक्त फडणवीस साहेबांनी बघावं. 29 ऑगस्टच्या आत तुम्ही आरक्षण देऊन टाका अन्यथा परिस्थिती हाता बाहेर जाईल त्यास जबाबदार तुम्ही राहाल असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.