
चिपळूण तालुक्यात दादरमध्ये दगडावर केली सुरणाची शेती.
चिपळूण तालुक्यातील दादर या गावचे सुपुत्र आणि जे. के. फाईल्स (गाणे-खडपोली) कंपनीमध्ये नोकरी करणारे विश्वनाथ सकपाळ यांनी अक्षरशः दगडावर सुरणाची शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. लहानपणापासून त्यांना शेतीची आवड आहे. शेतीमधील विविध प्रयोग करून लोकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे आणि पुन्हा एकदा शेतीला गतवैभव मिळवून द्यावे, असा त्यांचा कटाक्ष असतो.सुमारे १७ वर्षांपूर्वी त्यांनी दादर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळच स्वतःचे घर बांधले. त्यांच्या या घराच्या अवतीभोवतीचा परिसर संपूर्णपणे कठीण दगडाने व्यापलेला होता. त्यामुळे याठिकाणी एखादे झाड लावावे, भाजीपाला लागवड करावी असे मनी आणले तरी या कठीण दगडाच्या जमिनीत हे शक्य वाटत नव्हते.
मात्र त्यांनी माघार घेतली नाही. दूरदृष्टी, ईच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर याच कातळ जमिनीवर लागवड करायचे त्यानी मनोमन ठरविले. सुरुवातीला या जमिनीमधील सहज शक्यअसेल तो एक एक दगड बाहेर काढण्यावर भर दिला आणि कालांतराने त्या जमिनीमध्ये जिथे जिथे मोकळी जागा मिळेल तिथे विविध प्रकारच्या वृक्ष प्रजाती, वेली, झुडूप आणि कंदवर्गीय दादरमध्ये दगडावर केली सुरणाची शेती झाडे, भाजीपाला लावण्याचा सपाटा लावला.
यामध्ये त्यांनी देशी प्रजातीचे सुरण लावण्याचा विचार करून तशी कृती केली. या जमिनीत सुरण लावण्याचा त्यांचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला असून संपूर्ण क्षेत्र सुरणाच्या पिकाने व्यापलेले पहावयास मिळत आहे.घराशेजारच्या ८ गुंठे जमिनीमध्ये त्यांनी गतवर्षी सुरणाचे पिक जाणीवपूर्वक जोपासले असून गत वर्षी त्यांनी स्थानिक बाजारपेठ आणि ओळखीच्या माणसांकडे २५० किलो सुरणाची विक्री केली आहे. या विक्रीमधून त्यांना गत वर्षी २०,००० रु. मिळाले. यावर्षी देखिल मोठ्या प्रमाणात सुरणाचे पिक आले असून येत्या ऑक्टोबरमध्ये हे सुरण काढणीस येईल असे त्यांनी सांगितले. प्रयोशील मन, मेहनत आणि कल्पक बुध्दी यांच्या बळावर हे शक्य झाले असे श्री. विश्वनाथ सकपाळ यांचे म्हणणे आहे. सुरण पिकाबरोबर वर्षभर पुरेल एवढी काळीमिरी, करांदा, आंबा, चिकू, फणस, कोकम, आवळा, विलायती आवळा, लिंबू, नारळ, रामफळ, तमालपत्र, काजू, कडीपत्ता, शेवगा, पेरु, मोसंबी ही पिकेदेखिल त्यांनी घेतलेली आहेत. त्याचबरोबर भेट कलम, गुटी कलम, बाटा कलम आदी कलमे बांधण्याची कलादेखिल त्यांनी अवगत केली आहे.www.konkantoday.com