
शृंगारतळी येथील रस्त्यालगत अंगणवाडी पोषण आहाराची पाकिटे गटारात.
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील रस्त्यालगत असणार्या गटारात अंगणवाड्यांमध्ये मुलांना देण्यात येणारी पोषण आहाराची सीलबंद पाकिटे आढळून आली आहेत. ही पाकिटे नेमकी कुणी व का टाकली याचा अद्याप उलगडा झालेला नाही.मूगडाळ व खिचडींचे मिश्रण असलेली ही पाकिटे ३ ते ६ वर्षाच्या बालकांना दिली जातात. यामागे प्रथिने पुरवठा होण्यासाठी पोषण आहार तयार करण्याचे उद्दिष्ट अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहे. अंगणवाड्यांना शासनाकडून पुरवठा होणारे धान्य नेमके किती येते व त्यातून वाटप किती होते आणि पोषण आहारासाठी नेमके धान्य लागल्यानंतर महिन्याकाठी किती उरते, याचा कुठलाही ताळेबंद बहुतांशी अंगणवाडीत दिसून येत नसल्याचे अशा उघड्यावर सापडणार्या पाकिटांवरून दिसत आहे. शृंगारतळी बाजारपेठैतील गटारात पोषण आहाराची बंद पाकिटे आढळल्याने ही पाकिटे इथे कशी आली, हे अद्याप समोर आलेले नाही. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला.www.konkantoday.com