यशवंतगड किल्ल्याच्या पुनर्बांधकामासाठी समिती गठीत.

राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील यशवंतगड किल्ल्याच्या दुरूस्तीच्या कामादरम्यान नव्याने बांधलेली तटबंदीची भिंत पहिल्यांदाच पावसात कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर यशवंतगडाच्या जतन व संवर्धनाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी यशवंतगड किल्ला पुनर्बांधकामासाठी शासनाकडून व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे.साखरीनाटे ग्रामपंचायत हद्दीदील ऐतिहासिक घेरायशवंतगड किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाचे काम सुरू असताना यावर्षी पहिल्याच पावसात नव्याने बांधण्यात आलेली तटबंदी कोसळली. त्यामुळे या निकृष्ट कामाबाबत पुरातत्व विभाग तसेच ठेकेदाराविरोधात शिवप्रेमींतून रोष व्यक्त करण्यात येत होता. पावसाळी अधिवेशनामध्येही कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी यशवंतगड किल्ल्याच्या निकृष्ट बांधकामाचा मुद्दा उचलून धरत कारवाईची मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर शासनाकडून स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींचा योग्य ताळमेळ जमवून समिती गठीत केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button