
मुलीवर वर्षभरापूर्वी अतिप्रसंग करणाऱ्या एका आरोपीला डोंबिवली पोलिसांनी केली अटक
डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीवर कसारा-अकोला दरम्यान एक्स्प्रेसमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली. कल्याण रेल्वे पोलिसांनी अकोलामध्ये ही कारवाई केली.त्यापाठोपाठ या मुलीवर वर्षभरापूर्वी अतिप्रसंग करणाऱ्या एका आरोपीला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे.डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर मोनू शेख आणि त्याचा बाप हनीफ शेख यांनी वर्षभरापूर्वी अत्याचार केले होते. मोनू शेखनं विनयभंग केला. तर हनीफ शेखनं तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणातील विनयभंग करणारा आरोपी मोनू शेखरला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तर मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या हनिफ शेखचा मानपाडा पोलीस शोध करत आहेत. पीडित अल्पवयीन मुली राहत असलेल्या परिसरात आरोपी बाप लेक राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी अकोला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांना सापडली होती. त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये या धक्कादायक प्रकारची माहिती उघड झाली. त्याचबरोबर आपल्यावर साधारण वर्षभरापूर्वी आणखी एका तरुणानं बलात्कार केल्याची जबानी या तरुणींनी पोलिसांना दिली.
पीडित तरुणीनं दिलेल्या माहितीनुसार ती डोंबिवलीतील एका सुखवस्तू कुटुंबातील आहे. साधारण वर्षभरापूर्वी एका तरुणानं आपल्यावर बलात्कार केला, असल्याचं तिनं सांगितलं. पीडित मुलीनं दिलेल्या माहितीनंतर अकोला रेल्वे पोलिसांनी एक प्रकरण कल्याण रेल्वे पोलिसांकडे सोपवले. तर वर्षभरापूर्वी झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास डोंबिवली पोलीस करत होते.