
जिल्ह्यातील ९८ ग्रामपंचायतींना मिळणार नवा साज.
ग्रामपंचायतीच्या कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनेंतर्गत राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींना सुसज्ज इमारती मिळत आहेत. जिल्ह्यात यापूर्वी या योजनेतून अनेक ग्रामपंचायत इमारतींची बांधकामे करण्यात आली आहेत तरीही अजून ९८ ग्रामपंचायतींच्या इमारती जीर्ण बनल्याने त्या धोकादायक इमारतींच्या बांधकामाचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत.ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजना आणि मातोश्री बाळासाहेब ठाकरे ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना या दोन महत्वाकांक्षी योजनांनी ग्रामविकासाला नवी दिशा दिली आहे. राज्य शासनाच्या या योजनांमुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय सोयीसुविधा वाढल्या आहेत. शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजाला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत इमारत बांधकाम योजनेंतर्गत राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींना सुसज्ज इमारती मिळत आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींना स्वतःची मालकीची इमारत बांधण्यासाठी किंवा जुन्या इमारतींची दुरूस्ती व विस्तार करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे हा आहे.www.konkantoday.com