खेडमध्ये जगबुडी, नारिंगी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
खेड : शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सायंकाळी जगबुडी नदीने ६.८५ मीटर पातळी गाठली आहे. चोवीस तासात ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
खेड तालुक्यात ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकाना अंधारात चाचपडत बसावे लागत आहे.
वीज वाहिन्यांवर झाड्यांच्या फांद्या मोडून पडल्याने काही गावांचा वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.




