
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी…
*शिवसेना नेते सचिव मा.खासदार श्री विनायकजी राऊत यांच्या संकल्पनेतून व जिल्हाप्रमुख (दक्षिण) श्री दत्तात्रय कदम यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पाचही तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी सकाळी 11.00 वा. गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुख हिंदुह्दयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा भव्यदिव्य बॅनर उभा करुन बाळासाहेबांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक व पुजन करुन गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.


यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत सर्व संघटना पदाधिकारी यांनी तालुक्याच्या नियोजित ठिकाणी उपस्थित राहून गुरुपौर्णिमा साजरी केली.

