
पक्षी वैभव सिंधुदुर्गच्या पर्यावरण व पर्यटन विकासासाठी फारच महत्त्वाचे-डॉ. गणेश मर्गज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी 300 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आढळून येतात. पक्षी वैभव सिंधुदुर्गच्या पर्यावरण व पर्यटन विकासासाठी फारच महत्त्वाचे आहे. मात्र, जिल्ह्यात होणारी बेसुमार वृक्षतोड
आणि मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होत असल्याची चिंता प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी व्यक्त केली आहे.
वन्यजीव सप्ताहानिमित्त वाईल्ड कोकण सावंतवाडी आयोजित ऑनलाईन वेबिनारमध्ये ‘सिंधुदुर्गातील पक्षी विविधता’ विषयावर डॉ. मर्गज बोलत होते.
www.konkantoday.com