
रत्नागिरी साखरतर मार्गावरील रस्त्याची दुरावस्था, तक्रार करणाऱ्या नागरिकांना अधिकार्यांकडून टोलवाटोलवीचीे उत्तरे
सध्या मुसळधार पाऊस सुरू होताच अनेक ठिकाणी रस्त्याच्या खड्ड्यानी डोके वर काढले आहे रत्नागिरी साखरतर रस्त्यावर शिरगाव दत्त मंदिर ते रेशन दुकान या भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे पावसात हे खड्डे पाण्यानी भरल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत याबाबत जागृत नागरिक म्हणून या भागातून नेहमी प्रवास करणारे अजय प्रसादे यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याकडे पंधरा दिवस पाठपुरावा सुरू केला आहे.

या विभाग ज्यांच्या अत्यारित येतो ते सर्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अमृत पावेल यांच्याकडे प्रसादे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे आपण प्रत्यक्ष येऊन खड्ड्याची पाहणी करावी अशी मागणी केली परंतु पंधरा दिवस होऊनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे हे खड्डे केवळ मातीने भरले जात आहेत पुन्हा पाऊस हे खड्डे पुन्हा तसेच तयार होत असून उलट त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य होत आहे मात्र खात्याचे म्हणणे की आम्ही खड्डे भरले आहेत ही वस्तुस्थिती दाखवूनही संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत आपणाला नाईलाजाने वृत्तपत्रांकडे धाव घ्यावी लागेल असे सांगतात संबंधित अधिकाऱ्याने तुम्हाला कुठे जायचे तिथे जा अशा शब्दात उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांना हक्काची सुविधा मिळावी या दृष्टीने एक जागरूक नागरिक रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पाठपुरावा करीत असेल तर त्याला अशा प्रकारे टोलवाटोलवीचे उत्तरे देत असतील तर या सामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न निर्माण झाली आहे.

सध्या पावसाने उघडीप घेतली असून सदर ठिकाणी संबंधित खात्याला डांबराने खड्डे बुजवणे शक्य आहे मात्र ते न करता केवळ केवळ माती व दगड भरून थातुरमातुर दुरुस्ती करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे त्यामुळे नागरिकांच्या असंतोष निर्माण झाला आहे
