
महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या कामांसाठी तीन वर्षांनी निधी उपलब्ध.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात सावर्डे येथील पोलीस ठाणे, तलाठी कार्यालय आणि महापुरुष मंदिर बाधित झाल्यानंतर त्यांच्या पुनर्बाधणीसाठी सुमारे २ कोटी ७१ लाखाचा निधी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजूर केला. तब्बल तीन वर्षानंतर या कामांना सुरुवात झाली आहे. मात्र २६ गुंठा जागेत उभारण्यात येणार्या या कामांच्या आराखड्यात रस्ता व मंदिराचा समावेश नसल्याने शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत चौकशीची मागणी केली आहे.महामार्गात बाधित झालेल्या सावर्डे येथील तलाठी, पोलीस स्थानक व महापुरुष मंदिर यांच्या पुनर्बाधणीसाठी माजी तालुकाप्रमुख सावंत यांनी गेल्या चार वर्षांपासून लढा दिला. या तिन्ही कांमाना निधी मिळण्यासाठी २०२३मध्ये महाआरती आंदोलन केले. मात्र तरीही दुर्लक्ष केले गेल्याने सावंत यांनी त्यानंतरही दोन वेळा महामार्गावर आंदोलने केली. त्यांच्यासह उपलब्ध असतानाही गेल्या तीन वर्षात कामे सुरू झाली नाहीत. कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले. या आंदोलनामुळे ११ ऑगस्ट २०२३मध्ये तलाठी, पोलीस स्थानक व महापुरुष मंदिरासाठी २ कोटी ७१ लाख ३७हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. निधीwww.konkantoday.com