
बारा दिवसांपूर्वीच लग्न होउन घरात आलेल्या सुनेनेच घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेउन पोबारा केला
बारा दिवसांपूर्वीच लग्न होउन घरात आलेल्या सुनेनेच घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेउन पोबारा केला. ही घटना गुरुवार 10 जुलै रोजी सकाळी 11.50 वा.सुमारास पाली-मोहितेवाडी येथे घडलीदत्ताराम राजाराम मोहिते (59,रा.मोहितेवाडी पाली,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित सुनेचे फिर्यादी सासर्यांच्या मुलाशी 28 जून 2025 रोजी लग्न झाल होत. त्यानंतर तिने सासरे दत्ताराम मोहिते यांचा विश्वास संपादन केला. गुरुवार 10 जुलै रोजी सकाळी 11.50 वा.सुमारास घरातील बेडरुममध्ये असलेल्या लोखंडी कॉटखाली ठेवलेल्या पत्र्याच्या कुलुप बंद पेटीतील 3 लाख 2 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 60 हजार असा एकूण 3 लाख 62 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 316(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.