
जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 अधिनस्त तालुका कार्यालयांसाठी भाडेतत्वावर जागा हवी.
रत्नागिरी, दि. 11 : जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था रत्नागिरी या शासकीय कार्यालयाचे अधिनस्त असलेली शासकीय तालुका कार्यालये मंडणगड, दापोली, चिपळूण, खेड, गुहागर, संगमेश्वर, लांजा व राजापूर या कार्यालयांसाठी जागा भाडेतत्वावर घेण्यासाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक जागामालकांनी आपली दरपत्रके दि. 21 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था रत्नागिरी, या कार्यालयात सादर करावीत, असे सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी कळविले आहे.
दिनांक 22 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता सदर दरपत्रके समितीसमोर उघडण्यात येतील. ज्याचा दर कमीत कमी असेल असा दर स्वीकृत होईल व त्यांना पत्रान्वये कळविण्यात येईल.सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दि.12 मार्च 1956 व 30 मे 2007 च्या परिपत्रकानुसार तालुका कार्यालयासाठी खालीलप्रमाणे जागेची आवश्यकता आहे.मंडणगड साठी 91 चौ.फुट, दापोलीसाठी 273 चौ.फुट, चिपळूणाठी 364 चौ.फुट, खेड साठी 91 चौ.फुट, गुहागरसाठी 91 चौ.फुट, संगमेश्वर साठी 91 चौ.फुट, लांजासाठी 91 चौ.फुट, राजापूरसाठी 91 चौ.फुट जागेची आवश्यकता आहे.
अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. दरपत्रकावरती पूर्ण पत्ता व दूरध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. जागामालकाचे पॅनकार्ड व आधारकार्ड यांचे छायांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे. इमारतीचा नकाशा, इमारतीच्या बांधकामाचा नगरपरिषद/ ग्रामपंचायतीचा पूर्णत्वाचा दाखल्याची सत्यप्रत तसेच घरमालकाचे संमत्तीपत्र, चालू आर्थिक वर्षाची घरपट्टी पावतीची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. इमारतीच्या नकाशामध्ये भाडयाने दयावयाच्या जागेचा भाग लाल रंगाने दर्शविण्यात यावा. दरपत्रकाबरोबरच जी जागा कार्यालयासाठी द्यावयाची आहे त्या जागेचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे भाडे योग्यता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
कार्यालयासाठीच्या जागेमध्ये वीज, पिण्याचे पाणी, व संडास बाथरुमची सोय असणे आवश्यक आहे. किमान चार पात्र निविदादारांच्या निविदा प्राप्त झाल्यास निविदा प्रक्रीया पुढे चालू ठेवण्यात येईल अन्यथा निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात येईल. कोणतेही दरपत्रक कारण न देता निविदा नाकारण्याचा किंवा संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार कार्यालय प्रमुख यांना आहे. निविदादारांनी निविदा प्रक्रियेत कोणताही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास अशा नियमबाहय वर्तन करणाऱ्या निविदादाराची निविदा रद्द करण्यात येईल. काही प्रशासकीय अडचणींमुळे दरपत्रक/निविदा विहित दिनांकास उघडता न आल्यास नजिकच्या पुढील दिनांकास उघडण्यात येतील. सदरचे दरपत्रक बंद लखोट्यामध्ये जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था रत्नागिरी, 325 ए विंग 1 ला मजला प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जयस्तंभ रत्नागिरी या कार्यालयात सादर करावे.000




