
जानवळे फाटा शेजारी शासनाचा पोषण आहार पाकिटे कचऱ्यामध्येमनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर आक्रमक.
गुहागर : शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीची पाकीटे रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात टाकल्याचा प्रकार नुकताच गुहागर तालुक्यातील जानवळे फाट्याजवळ दिसून आला आहे. या प्रकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर हे आक्रमक झाले असून शाळेचा पोषण आहार की अंगणवाडीचा पोषण आहार याची शासनाने तात्काळ चौकशी करावी, अशी आग्रही मागणी विनोद जानवळकर यांनी केली आहे.

यासंदर्भात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र शासन बालकांना पोषण आहार शाळांमध्ये पुरवण्याचे काम करत आहे; मात्र त्याची एक्सपायर डेट संपण्याआधीच शासनाच्या या पोषणा आहार खिचडीची पाकीटे कचऱ्याच्या ढिगार्यामध्ये आढळून आल्याची घटना घडली असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथ: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका पवित्रा घेणार असल्याचा इशारा यावेळी जानवळकर यांनी दिला आहे.