
राजापूर तालुक्यातील घेरा यशवंतगडाच्या निकृष्ट बांधकामाची सखोल चौकशी होणार -आशिष शेलार.
राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथील घेरा यशवंत गडाच्या दुरुस्तीसाठी सुमारे आठ कोटी रुपय खर्चुनही त्याच्या झालेल्या निकृष्ट दुरुस्तीची सांस्कृतिक विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी दिली. या संदर्भात प्रश्न आमदार भाई जगताप यांनी विचारला होता.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे या गावातील ऐतिहासिक घेरा यशवंत गडाचे दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. हा किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असून किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ८ कोटी १८ लाख रुपयांचा निधी खर्ची करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी वापरण्यात आलेले सिमेंट निकृष्ट दर्जाचे आहे. हात लावताच सिमेंट आणि खाली पडतो. दुरुस्त केलेला काही भाग कोसळण्याची घटनाही घडली आहे.www.konkantoday.com




