
रत्नागिरी जिल्ह्यात १९ वाळू गट लिलाव प्रक्रिया पुन्हा लांबणीवर.
जिल्हा खनीकर्म विभागाने २२ ड्रेझर वाळू गटांचा लिलाव काढले आहेत. तीन वर्षांसाठीच्या या लिलाव प्रक्रियेतून जिल्हा प्रशासनाला सुमारे ३३ कोटी महसूल मिळणे अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंत फक्त ३ ड्रेझर वाळू गटांचाच लिलाव झाला आहे. कमी प्रतिसाद मिळाल्याने फेर लिलाव प्रक्रिया करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. उर्वरित १९ वाळू गट लिलाव प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे.वाळू लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याने २ जुलैला तिसर्यांदा फेरलिलावासाठी निविदा प्रक्रिया करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. जिल्ह्यातील ड्रेझर वाळू गटामध्ये सुमारे ५ लाख २८ हजार ४२५ ब्रास वाळूसाठा असल्याचा मेरिटाईम बोर्डाचा सर्वे आहे. बदलत्या वाळू धोरणामुळे जिल्हा खनीकर्म विभागाकडून लिलावाच्या माध्यमातून मिळणार्या महसुलावर मोठा परिणाम झाला. गेल्या आर्थिक वर्षांमध्ये पहिल्या वाळू धोरणाला स्थगिती देण्यात आली.www.konkantoday.com