
रत्नागिरीचं पाणी आता केवळ तहान भागवत नाही, तर अभिमान जागवतो!
पर्यटनवाढीच्या दृष्टीने संपूर्ण रत्नागिरी जिल्हाच एक सुंदर डेस्टिनेशन म्हणून उभं राहण्याची क्षमता बाळगतो.
हे स्वप्न फक्त बोलून न थांबता, ADD PLUS पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे श्री. मंगेश सोनार आणि रत्नागिरीचे अधिकृत वितरक आशुतोष बिस्वा यांनी प्रत्यक्ष कृतीतून उतरवले आहे.
चर्चेच्या वेळी व्यक्त झालेली एक कल्पना —
“पाण्याच्या बाटलीवर रत्नागिरीचं पर्यटन दाखवूया… QR कोड देऊया… जगाला दाखवूया आपला जिल्हा!”
ही कल्पना काही दिवसांतच सत्यात उतरली.
या उपक्रमाला रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन,(टुरिझम स्काय लाईन ) मुसाफिरी डॉट कॉम चे श्री. सारंग ओक(QR कोड)यांचंही अतिशय मोलाचं सहकार्य लाभलं, आणि
“SPECIALLY PACKED FOR RATNAGIRI” असं ठळकपणे लिहिलेली, पर्यटन माहिती असलेली खास पाण्याची बॉटल आज आपल्या हाती आहे.
✅ पाण्याची बाटली आता माहितीचं माध्यम झाली आहे
✅ स्थानिक पर्यटनाचं नवं दालन उघडत आहे
✅ रत्नागिरीचा ब्रँड, थेट लोकांच्या हृदयात पोहोचतो आहे
या त्रिसूत्री यशाच्या मागे आहे कल्पकता, बांधिलकी आणि रत्नागिरीवरची निष्ठा.
श्री. मंगेश सोनार, आशुतोष बिस्वा आणि सारंग ओक यांची मेहनत आहे
रत्नागिरीचं पाणी आता केवळ तहान भागवत नाही, तर अभिमान जागवतो!




