
पी.एम. सुर्यघर – मुफ्त बिजली योजना (Roof Top Solarization) राबविणे बाबत आढावा सभेचे आयोजन
मा.सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील परिपत्रकीय सुचनांनुसार केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी पी. एम. सुर्यघर – मुफ्त बिजली योजना (Roof Top Solarization) राबविणेसाठी राज्यातील निवडक ४५ शहरांमध्ये रत्नागिरी शहराची निवड केलेली आहे. रत्नागिरीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांमार्फत पी.एम. सुर्यघर – मुफ्त बिजली योजना (Roof Top Solarization) मध्ये सहभागी होणेसाठी व सदर योजनेबाबत माहिती देणेकामी सोमवार, दि. १४/०७/२०२५ रोजी सायं. ०६ ते ०८ या वेळेत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी, प्रधान कार्यालय, जयस्तंभ, रत्नागिरी येथे आढावा सभेचे आयोजन केलेले आहे. सदर आढावा सभेस मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रत्नागिरी, अधिक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय, रत्नागिरी, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन मर्या. रत्नागिरी व मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. तरी रत्नागिरीतील सर्व गृहनिर्माण संस्था अध्यक्ष/सचिव/ पदाधिकारी यांनी सदर आढावा सभेस उपस्थित राहावे असे अवाहन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांनी केलेले आहे.



