
देवरुख शाळा क्र. ३ च्या धोकादायक वर्गखोल्या कोणत्याही क्षणी कोसळतील, त्या पाडण्यासाठी प्रशासनाकडे मागणी.
देवरुख शहरातील आदर्श शाळा क्र. ३ च्या वर्गखोल्या धोकादायक झाल्या असून कोणत्याही क्षणी त्या कोसळतील अशा स्थितीत आहेत. त्यामुळे या वर्गखोल्या पाडण्यात याव्यात याबाबतचा पत्रव्यवहार प्रशासनाकडे करण्यात आला आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अधिकारी एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.शाळा क्र. ३ ही जिल्हा परिषदेची नावाजलेली शाळा आहे. सध्या २५० हून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळा इमारत खूप जुनी असल्याने ती देवरुख येथील शाळा क्र. ३ च्या धोकादायक वर्गखोल्या. धोकादायक बनली आहे. वर्गखोल्यांमधील कौले, वासे, रिपा ढासळू लागल्या आहेत खांब व भिंती देखील धोक्याची घंटा वाजवत आहेत.www.konkantoday.com