
कोकण मार्गावर धावणार्या गणपती स्पेशल गाड्यांची बुकींग तीन टप्प्यात घ्या, अक्षय महापदी यांचे रेल्वे बोर्डाला निवेदन.
कोकण मार्गावर धावणार्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण एकाच वेळेला अप आणि डाऊन दोन्ही दिशांसाठी सुरू केले जाते. यामुळे तिकिट खिडकी उघडल्यानंतर काही मिनिटातच आरक्षण फुल्ल होते. त्यामुळे चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणपती स्पेशल गाड्यांचे बुकींग प्रवासाची दिशा आणि तारखेनुसार ४५ दिवस, ३० दिवस, १५ दिवस अशा तीन टप्यात ठेवा, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.गणेशोत्सवातील नियमित गाड्यांचे आरक्षण खुले होताच अवघ्या दीड मिनिटातच आरक्षण फुल्ल होऊन तासनतास तिकिट खिडक्यांवर उभ्या राहिलेल्या चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे. गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण तीन टप्यात ठेवल्यास प्रवाशांना सोयीचे ठरेल. काही अडचणींमुळे निश्चित एसआरपी शक्य नसल्यास अप आणि डाऊन दिशानिर्देशांसाठी बुकिंग वेगवेगळ्या तारखांवर उघडता येते. यामुळे प्रवाशांना त्यांचा संपूर्ण प्रवास नियोजन करण्याची योग्य संधी मिळते.यासाठी यातील योग्य पर्यायांची अंमलबजावणी केल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल. उत्सवाच्या हंगामात अधिक व्यवस्थित प्रवास नियोजन सुनिश्चित होईल. यामुळे तत्काळ कोट्यावर अवलंबून असणार्यांचा भार कमी होऊन बुकींग पद्धतीत होणारा गैरप्रकारही रोखण्यास मदत होईल. मागणीचा सकारात्मक विचार करण्याचा आग्रहही निवेदनाद्वारे धरण्यात आला आहे.www.konkantoday.com