
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सेंट थॉमस स्कूलला जिल्हास्तरावर अजिंक्यपद
रत्नागिरी दि.९: डेरवण येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेमध्ये सेंट थॉमस शाळेच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. या शाळेतील १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने व १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर अजिंक्यपद मिळविले आहे. १५ वर्षाखालील मुलांच्या संघाने देखील जिल्हास्तरावर अजिंक्यपद मिळविले आहे. विद्यार्थ्याना क्रीडा शिक्षक अजित धावडे, सौ स्वप्नाली पवार यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यानी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस, शाळेचे मुख्याध्यापक फादर जॉर्ज, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.