
राज्य सरकारी जिल्हा परिषद निमसरकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे धरणे निदर्शने आंदोलन यशस्वी.
रत्नागिरी : चार श्रम संहिता आणि PFRDA कायदा रद्द करणे व इतर प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी जिल्हा परिषद निमसरकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमीचे आजचे (९ जुलै) धरणे निदर्शने आंदोलन यशस्वी झाले. देशातील प्रधान कर्मचारी कामगार संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने आज (९ जुलै) देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. राज्य सरकारी जिल्हा परिषद निमसरकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत गेली २ वर्षे संघटनात्मक सततचे प्रयत्न करीत आहे.
एकीचे बळ जपण्यासाठी वरील देशव्यापी संप आंदोलनात सहभागी होणे आवश्यक होते; परंतु राज्यस्तरावरील मागण्यांसाठी तीव्र आंदोलन आसपासच्या कालावधीत करावे लागणार असल्याने या बाबीचा सर्वं सर्वकष विचार करून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ९ जुलै रोजी प्रथम जिल्हा परिषद कार्यालय रत्नागिरी व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे निदर्शने करून मा. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मा. मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले निवेदन सादर करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा रत्नागिरीमार्फत आज दुपारी १ ते ३ या वेळेत प्रथम जिल्हा परिषद कार्यालय रत्नागिरी व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे धरणे निदर्शने केली आहेत.
या धरणे निदर्शने आंदोलनामध्ये जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश सिनकर, सल्लागार समीर इंदुलकर, श्रीमती अश्विनी कदम, श्रीमती मुग्धा पत्की, श्रीमती मेघा पावसकर, लिपिकवर्गीय संघटनेचे संजय गार्डी, नागेश पाडावे, प्रकाश कांबळे, महेश गुरव, प्रमोद चव्हाण, उमेश पंडीत, लेखा कर्मचारी संघटनेचे सिध्दार्थ शेट्ये, अक्षय भाटकर, स्वप्नील मुरकर, विस्तार अधिकारी संघटनेचे श्री. बोडखे, आफ्रोह संघटनेचे अध्यक्ष किशोर रोडे, परिचर संघटनेचे रमेश गोरे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे संजय साळवी आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.