
रत्नागिरी शहरा नजिकाच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचयातीच्या माजी सरपंच धनश्री दिपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे दुःखद निधन.
रत्नागिरी शहरा नजिकाच्या शिरगाव ग्रुप ग्रामपंचयातीच्या माजी सरपंच धनश्री दिपक सनगरे (वैशाली गावडे) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेमृत्यूसमयी धनश्री यांचे वय 49 वर्षे इतके होते. अल्पशा आजारपणामुळे त्यांच्यावर कोल्हापूर येथे रूग्णालयात उपार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांचे प्राणज्योत मालवली. एक मनमिळावू, हसतमुख, सुस्वभावी व्यक्तीमत्व म्हणून त्या परिचित होत्या. शिरगांव ग्रामपंचायतींचे माजी सरपंचपद त्यांनी यशस्वीपणे भूषविले होते. आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गावातील विकासकामे मार्गी लावण्यात त्याचां मोठा हातभार लाभला. आजही त्यांचे वेळोवेळी सामाजिक, राजकीय उपक्रमांत त्या कार्यरत होत्या.धनश्री यांच्या निधनाने त्यांचा परिवार, नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिरगाव तिवंडेवाडी येथील दिपक नारायण सनगरे यांच्या त्या पत्नी आहेत




