
रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाकडे जाणारा खड्डेमय रस्ता तातडीने दुरुस्त करा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी
रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर
महाविद्यालयासमोर सिविल हॉस्पिटल च्या मागील बाजूला असणारा रस्ता सध्या मोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत खराब अवस्थेत आहे. दरवर्षी या रस्त्याची हीच दुरवस्था दिसून येत असून, स्थानिक प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे या मार्गावरून गोगटे कॉलेज जी जी पी एस मेस्त्री हायस्कूल मध्ये जाणारे अनेक विद्यार्थी रोज ये जा करीत असतात सध्या हा रस्ता चिखलाने व खड्ड्याने भरलेला आहे त्यातून मार्ग काढत जाणे हे विद्यार्थ्यांना कठीण होत आहेत यात अपघात होण्याची ही शक्यता आहे यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने आक्रमक भूमिका घेत, प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
खड्डे व चिखलामुळे विद्यार्थी वर्ग चिंतेत आहे कपडे चिखलाने माखतात, चालण्यासाठी रस्त्यावर जागा उरत नाही आणि अपघाताची शक्यता वाढते. संबंधित रस्ता रत्नागिरी नगरपालिका हद्दीत असूनही, प्रशासनाने अद्याप यावर ठोस पावले उचललेली नाहीत. याच पार्श्वभूमीवर अभाविप दक्षिण रत्नागिरीच्या शिष्टमंडळाने उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. सात दिवसांत रस्त्याची डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.