
रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा
रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’चा 17 पैकी 16 जागांवर दणदणीत विजय झाला. पण सध्या या विजयाची नाही तर या मागे झालेल्या पडद्यामागिल घडामोडींचीच चर्चा राज्यभर होत आहे. ही निवडणूक जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि जिल्हा सहकारी बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तर जिल्हा बँकेची निवडणूक सहकार पॅनेलने लढवली होती.जिल्हा सहकारी बोर्डाच्या निवडणुकीत यंदा उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडून सहकार पॅनेलविरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, लांजा – राजापूरचे आमदार किरण सामंत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यात बैठक झाली. ज्यानंतर राऊत यांनी शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार अखेरच्या दिवशी मागे घेतले. त्यामुळे सहकार पॅनेलचे 14 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे विरोधक असलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांनी कोणत्या भूमिकेतून आपल्या पक्षाच्या उमेदवारी मागे घेतल्या याबद्दल आता चर्चा सुरू आहे