
टोमॅटो ६० रुपयांवर; भाज्याही महाग, दर ८० रुपयांपर्यंत
टोमॅटोच्या दरात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये दिलासा मिळाल्यानंतर किरकोळ बाजारात दर पुन्हा ६० रुपये किलोवर गेला आहे. गेल्या दहा दिवसांपासून भेंडी, फरसबी, गवार, कारले, शिमला मिरची, पडवळ, सुरण या भाज्यांचे दरही किरकोळ बाजारात १० ते २० रुपयांनी वधारले आहेत.पुणे, नाशिक, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतून मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील बाजारपेठेत भाज्यांची आवक होते. गेल्या दहा दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक ५ ते १० टक्क्यांनी घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात प्रतिकिलो २ ते १२ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यात भेंडी, फरसबी, गवार, कारले, शिमला मिरची, पडवळ, सुरण भाज्यांचा समावेश आहे. किरकोळ बाजारात या भाज्यांचे दर १० ते २० रुपयांनी वधारले असून, या सर्व भाज्या किलोमागे ६० ते ८० रुपयांवर पोहोचल्या आहेत.
www.konkantoday.com