
‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत. मौजे केळ्ये येथे चारसुत्री पद्धतीने भात पीक लागवड प्रात्यक्षिक.
रत्नागिरी, दि. 9 :- रत्नागिरी तालुक्यातील मौजे केळ्ये येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत शेतकरी काशिनाथ बापट यांच्या प्रक्षेत्रावर चारसुत्री पद्धतीने भात पीक लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. सीआरए तंत्रज्ञाने फळबाग लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, प्रकल्प संचालक आत्मा विजय बेतीवार, तालुका कृषी अधिकारी रत्नागिरी विनोद हेगडे, तंत्र अधिकारी प्रमोद पाटील, तंत्र अधिकारी श्रीमती काळे, मंडळ कृषी अधिकारी श्री. मासाळ आदी अधिकारी आणि कर्मचारी शेतावर उपस्थित होते.