
सरकारी कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी फोटोसेशन करणे महागात पडणार.
शासकीय नागरिकांच्या कामांना संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन खोळंबा ठरत आहे. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे. शासनाने ठरवून दिलेली कार्यालयीन वेळ ही लोकसेवेसाठी आहे, वैयक्तिक सोहोळ्यांसाठी नाही, याचे भान संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी फोटोसेशन करणे महागात पडणार आहे.
याबाबत आता राज्य शासनाने कडक भूमिका घेत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९च्या अनुषंगाने परिपत्रक जारी केले आहे. कार्यालयीन वेळेत, कार्यालयीन जागेवर वैयक्तिक समारंभ घेणे, हा शिस्तभंग मानला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.कार्यालयीन वेळेत सेलिब्रेशनचा बेत आखला जातो. कामाच्या वेळेतच मोठ्या उत्साहात केक कापला जातो. कर्मचारी तासाभरासाठी काम बाजूला ठेवतात. काही ठिकाणी संगीत आणि मोबाईल व्हिडीओ शूटिंगही सुरू असते. यामुळेराज्य शासनाने जारी केलेल्या नियमानुसार, कोणताही सरकारी कर्मचारी कार्यालयीन वेळ आणि ठिकाणी अशासकीय, वैयक्तिक, धार्मिक वा सामाजिक कार्यक्रम आयोजित करू शकत नाही.