
यावर्षी डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर कमी.
रत्नागिरी जिल्ह्यात डेंगीचे रुग्ण वाढू नयेत यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे.त्यामुळे यावर्षी डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. जूनअखेर केवळ ७ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या २५६ होती.पावसाळा सुरू झाला आहे तसेच हवामानातील सतत बदल, वातावरणातील बदल यामुळे तालुक्यात डेंगीचा धोका निर्माण झाला आहे. डासांमुळे डेंगीची लागण होण्याचा धोका आहे. हा धोका ओळखून आरोग्य विभागाने जानेवारीपासून जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबवल्या आहेत. त्यामुळे यंदा डेंगीचे रुग्ण कमी झाले आहेत.